चिंचवडमधील टेल्को कंपनीजवळ झाड कोसळले

163

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – चिंचवडहून चिंचवड रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर टेल्को कंपनी आणि गावडे कॉलनीजवळ आज (गुरूवारी) दुपारी अचानक झाड कोसळले. यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही.  

अग्निशमक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कोसळलेले झाड बाजूला घेतले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. सुदैवाने झाड कोसळले, त्यावेळी तेथे कोणी  नव्हते. किंवा वाहन जात नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.