चिंचवडगावात मराठा मोर्चाच्यावतीने आयोजीत श्रध्दांजली शभे दरम्यान शहरातील विविध भागात हिंसा

505

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – चिंचवडगावात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभे दरम्यान काही टोळक्यांनी शहरातील वाल्हेकरवाडी भागात आठ ते दहा दुकानांवर दगड फेक केली. तर फुगेवाडी परिसरात एका पीएमपी बसवर दगडफेक करण्यात आली. या दोन्ही घटना आज (रविवार) सकाळी घडल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवार सकाळपासूनच सोशल मिडियावरून पिंपरी चिंचवड बंद असल्याचे मेसेज फिरत होते. तसेच चिंचवडगावात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मोर्चा दरम्यान मयत झालेल्या व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात काही टोळक्यांनी आठ ते दहा दुकानांवर दगडफेक करीत दहशत निर्माण केली. याघटनेमध्ये एचडीएफसी बॅंकेच्या एमटीएमचे आणि नेहा मोटर्स कंपनीच्या शोरूमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर दुसऱ्या घटनेत फुगेवाडी भागातील पीएमपी बस (क्र. एमएच/१२/एफसी/३३४३) वर दगडफेक करण्यात आली. आज रविवार सुट्टीच्या दिवशी अचानकपणे झालेल्या या दोन हिंसक घटनांमुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे. शहरातील विविध ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.