चिंचवडगावात तीन फ्लॅट फोडून पावनेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

222

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) –  चिंचवडगावात एकाच इमारतीतील तीन फ्लॅट फोडून २ लाख ६३ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. ही चोरी चिंचवडगावातील रघुनाथ प्रसाद अपार्टमेंट येथील फ्लॅट नं. १४ आणि श्रीरामराज पार्क अपार्टमेंट येथील फ्लॅट नं. ७ आणि ८ या तिन फ्लॅटमध्ये बुधवारी (दि.२९) रात्री ९ ते गुरुवारी (दि.३०) रात्री दोनच्या दरम्यान झाली. 

याप्रकरणी स्वानंद सिध्देश्र्वर घोडके (वय २९, रा. फ्लॅट नं.१४, रघुनाथ प्रसाद अपार्टमेंट, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२९) रात्री ९ ते गुरुवारी (दि.३०) रात्री दोनच्या दरम्यान चिंचवड गावातील रघुनाथ प्रसाद अपार्टमेंट येथील फ्लॅट नं. १४ आणि श्रीरामराज पार्क अपार्टमेंट येथील फ्लॅट नं. ७ आणि ८ या तिन फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. यावेळी चोरट्यांनी फ्लॅट नं.१४ चा कडी कोयंडा उचकटून २ लाख ६३ हजार किमतीचे सोन्या चांदी आणि मोत्याचे दागिने चोरुन नेले. चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.