चिंचवडगावातील मानाची दहिहंडी मुंबईतील सुंदरबाग गोविंदा पथकाने फोडली

158

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – चिंचवडगावातील मानाची दहिहंडी म्हणून ओळखली जाणारी अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीची दहिहंडी फोडण्याचा मान मुंबईच्या चेंबूर येथील सुंदरबाग गोविंदा पथकास मिळाला.

दहीहंडी कार्यक्रमाची सुरवात पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध असलेल्या ‘शिवाजी उदय मंडळाच्या पारंपारिक ढोल ताशा पथकाच्या वादनाने झाली. मुंबईच्या घाटला, चेंबूर येथील जय भवानी गोविंदा पथक व मुंबईच्याच चेंबूर येथील शितळादेवी गोविंदा पथकाने चित्तथरारक कसरतींचे प्रदर्शन व स्पर्धा करीत सलामी दिली. शितळादेवी गोविंदा पथकाने गोविंदा पथकाने दहिहंडी फोडली. जय मल्हार या मालिकेतील ‘बानूबाई’ म्हणजेच अभिनेत्री ईशा केसकर व राजा या मराठी चित्रपटातील नायिका स्थानिक कलावंत अभिनेत्री स्वरदा जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, नगरसेवक व दहीहंडी महोत्सवाचे आयोजक ॲड. मोरेश्वर शेडगे, माजी विरोधी पक्षनेत्या उमा खापरे, ब प्रभाग समिती अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, बाबू नायर, टाटा मोटोर्स युनियनचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर शेडगे, दत्ताभाऊ चिंचवडे, ब्राम्हण महासंघाच्या राष्ट्रीय महीला अध्यक्षा संजीवनी पांडे, रविंद्र देशपांडे, हरीभाऊ चिंचवडे, पाटीलबुवा चिंचवडे, धनंजय गावडे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, धनंजय शाळिग्राम, मधुकर बच्चे, अजित कुलथे, राघू चिंचवडे, सचिन राऊत, देवयानी भिंगारकर, हर्षद कुलकर्णी, राजन पाटील, अख्तर पिंजारी, प्राजक्ता गुजर आदी उपस्थित होते.