चावणाऱ्या कुत्र्याला आपण चावत नाही; मोदींच्या संदर्भातील प्रश्नावर कन्हैय्या कुमारचे उत्तर

313

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – कुत्रा आपल्याला चावला तरी आपण कुत्र्याला चावत नाही, असे उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदींसदर्भात विचारलेल्या प्रश्नावर विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार यांनी दिले. मुंबई प्रेस क्लबमध्ये कन्हैय्या कुमार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी तुम्हाला लोकप्रिय करण्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग असल्यामुळे त्यांना तुम्ही धन्यवाद द्याल का?  या प्रश्नावर  उत्तर देताना कन्हैय्या कुमार म्हणाले की,  अनेक धमक्या येतात, जाहीर सभांमध्ये हल्ले होतात, आवाज बंद करण्याचे प्रकार होतात,  देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो, असे अनेक दाखले देत ही प्रसिद्धी खडतर असल्याचे  त्यांनी सांगितले.

मी मोदींचे आभारच मानतो, त्यांना धन्यवाद देतो… ते यासाठी की त्यांच्यामुळे विरोधी शक्ती एकत्र आल्या आहेत. भाजपाविरोधात सगळ्या सेक्युलर संघटना एकत्र येणे हे घडून आले त्यासाठी मोदींना धन्यवाद द्यायला हवेत, अशी मार्मिक प्रतिक्रियाही कुमार यांनी व्यक्त केली.

आपण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहे. संधी मिळाल्यास तर निश्चितच लोकसभा लढवू, असे सांगून कन्हैय्या कुमार यांनी हिंदी भाषिक राज्यांमधून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.