चार लाख 32 हजारांच्या ट्रॉल्यांचा अपहार; एकास अटक

131

चाकण, दि. १९ (पीसीबी) – कंपनीने सामानाची ने आण करण्यासाठी विश्वासाने दिलेल्या 90 ट्रॉल्यांपैकी 72 ट्रोल्यांचा अपहार केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना 1 नोव्हेंबर 2021 ते 17 जानेवारी 2022 या कालावधीत चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

संतोष तुळशीराम भिसडे (वय 33, रा. बर्गे वस्ती, चिंबळी फाटा, ता खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हनुमंत भारत मांजरे (वय 37, रा. वडाचा मळा, देहूगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनीचे स्पेअर पार्ट आमेय कंपनी कुरुळी फाटा ते महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी निघोजे येथे ने आण करण्यासाठी फिर्यादी यांनी आरोपी संतोष यांच्याकडे विश्वासाने 90 ट्रॉल्या दिल्या होत्या. 1 नोव्हेंबर 2021 ते 17 जानेवारी 2022 या कालावधीत संतोष याने त्यातील चार लाख 32 हजार रुपये किमतीच्या 72 ट्रॉल्यांचा अपहार करून फिर्यादी यांची फसवणूक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर तपास करीत आहेत.