चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ

407

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ केला. तसेच कौटुंबिक कारणावरून झालेल्या भांडणानंतर विवाहितेला तिच्या लहान मुलीसह घराबाहेर हाकलून दिले. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी 2013 ते 7 जानेवारी 2022 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी व मोशी येथे घडली.

पती लक्ष्मीकांत मोरेश्वर खैरकर (वय 35), सासरे मोरेश्वर विठ्ठल खैरकर (वय 62) आणि सासू (सर्व रा. आळंदी रोड, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 32 वर्षीय विवाहितेने मंगळवारी (दि. 11) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या माहेरच्यांनी लग्नात लग्नात नऊ तोळे सोने हुंडा म्हणून आरोपींना दिले. आरोपी पती लक्ष्मीकांत याने फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेतला. फिर्यादी व तिच्या लहान मुलीस घराबाहेर हाकलून दिले व उपाशी ठेवले. तसेच वारंवार शिवीगाळ करीत हाताने मारहाण करून फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.. पोलीस उपनिरीक्षक आर के गिगे तपास करीत आहेत.