चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण

0
45

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 15) पहाटे तीन वाजताच्या सुमारास नेहरूनगर पिंपरी येथे घडली.

शिवराय प्रसन्ना हरळ (वय 57, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी 44 वर्षीय पत्नीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती शिवराय याने फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील स्टीलच्या कड्याने कपाळावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.