चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला चाकूने भोकसले

102

वाकड, दि. ७ (पीसीबी) – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या पोटात भाजी कापण्याचा चाकू खुपसून तिला गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. ५) रात्री जगताप नगर, थेरगाव येथे घडली.

धनंजय सिद्धेश्वर वाघमारे (वय ४०, रा. जगतापनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत २६ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पती-पत्नी आहेत. आरोपीने फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करून घरातील भाजीपाला कापण्याच्या चाकूने फिर्यादी यांच्या पोटात खुपसून गंभीर जखमी केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare