चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला गजाने मारहाण

72

भोसरी, दि. १९ (पीसीबी) – पती उशिरा घरी येणार असल्याने पत्नी मुलांसह मैत्रिणीच्या घरी झोपण्यासाठी गेली. त्यामुळे चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 18) पहाटे भोसरी येथे घडली. शिवाजी विश्वनाथराव बोचरे (वय 35 रा. गवळीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने रविवारी (दि. 18) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी बोचरे आणि फिर्यादी हे पती-पत्नी आहेत. 17 जुलै रोजी आरोपी पती घरी उशिरा येणार असल्याने पत्नी मुलांसह त्यांच्या मैत्रिणीच्या घरी रात्री झोपण्यासाठी गेली. या कारणावरून चिडलेल्या आरोपी शिवाजी यांने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर घरातील लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare