चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सासरकडच्यांविरोधात गुन्हा दाखल

322

वाकड, दि.३१ (पीसीबी) – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण आणि शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरकडच्यांविरोधात वाकड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेशकुमार वसंतराव जगताप (पती), शकुंतला वसंतराव जगताप (सासू), वसंतराव माधवराव जगताप (सासरा), हनुमंत वसंतराव जगताप (दिर), रा. कवळी, ता.औसा, जि.लातुर असे या आरोपींची नावे आहे. (आरोपींना अदयाप अटक नाही)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय २२वर्षे) यांच्या तक्रारीनुसार पती महेश हा दि.१० जुलै ते आता पर्यंत पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून वेळोवेळी मारहाण करून तिला शिवीगाळ करायचा आणि शारीरिक छळ करायचा असे पिडीतीने पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणी फिर्यादीने पतीसह सासरकडच्यांविरोधात वाकड पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास सा.पोलिस निरीक्षक देवताळे करीत आहे.

WhatsAppShare