चायनीज खाल्ल्याचे पैसे न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण

251

चिखली, दि. १४ (पीसीबी) – चायनीज खाल्ल्यानंतर त्याचे पैसे न दिल्याने चार जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 11) रात्री आठ वाजता अष्टविनायक चौक आणि टॉवर लाईन चिखली येथे घडली.

विलास बिरूणगी असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मलम्माबाई शरणप्पा बिरूणगी (वय 44, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहित वाबळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याचे दोन ते तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा विलास मंगळवारी रात्री आरोपी रोहित याच्या चायनीजच्या गाडीवर चायनीज खाण्यासाठी गेला. चायनीज खाल्ल्यानंतर विलासने चायनीजचे पैसे दिले नाहीत. त्यावरून आरोपी रोहित आणि त्याच्या साथीदारांनी विलासला मारण्यास सुरुवात केली. त्याला घाबरून विलास पळून गेला. त्यावेळी टॉवर लाईन येथे आरोपींनी विलास याला अडवून दगडाने डोक्यात, पायावर मारहाण करून जखमी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद तपास करीत आहेत.