चायनीजच्या गाडीवर सिगारेट पिण्यास मनाई केल्याने महिलेचा विनयभंग; तरुणाला अटक..

81

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – चायनीजच्या गाडीवर सिगारेट पिणा-या तरुणाला विरोध केल्याने तरुणाने महिलेचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 15) रात्री चिंचवड येथे घडली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

समीर देवकर (वय 20, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रामनगर येथील बस स्टॉपच्या बाजूला चायनीजची गाडी चालवते. शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी देवकर हा महिलेच्या चायनीजच्या गाडीवर आला. तो तिथे सिगारेट पिऊ लागल्याने फिर्यादी यांच्या बहिणीने त्यास येथे सिगारेट पिऊ नको असे सांगितले. या कारणावरून आरोपी देवकर फिर्यादी यांच्या बहिणीच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी फिर्यादी यांनी अंगावर जाऊ नकोस लांबून बोल, असे सांगितले. त्यामुळे आरोपी देवकर याने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. वाघमारे तपास करीत आहेत.