चायनातून भारतात स्थलांतर करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांना राष्ट्राध्यक्ष ट्रंम्पने दिली धमकी

156

प्रतिनिधी,दि.१६ (पीसीबी) : कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर चायना मध्ये उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या भारतात स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत असल्याचे बोलले जात आहे. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणे, टेक्स्टाईल्स, सिंथेटिक फॅब्रिक आदी क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या मातब्बर कंपन्या भारतात आल्यास भविष्यकाळात भारत मॅन्युफॅक्चरींग हब होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्पने चायनातून भारतात कंपनी स्थलांतरीत करणाऱ्या अमेरिकन उत्पादकांना धमकी दिली आहे. जगभरात सर्वात अग्रेसर असलेल्या आयफोन मोबाईलचे उत्पादक ॲपल कंपनी चायना मधून भारतात स्थलांतर करण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. परंतु राष्ट्राध्यक्ष ट्रंम्प यांनी असे झाल्यास ॲपल कंपनीला अमेरिकेत जादा टॅक्स आकारला जाईल व त्यांना देण्यात आलेल्या सुविधा काढून घेण्यात येतील अशी धमकीच दिली. तसेच ॲपल कंपनीने १०० % उत्पादन अमेरिकेतच करावे असे ठासून सांगितले. राष्ट्राध्यक्ष ट्रंम्प यांच्या अशा भूमिकेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेक ईन इंडिया” संकल्पाला धक्का बसला आहे.

जगभरात कोरोना वायरसचा विळखा अधिकच घट्ट होत चालले आहे. चायनाच्या वूहान शहरातून हा वायरस पसरल्याने जगभर चायना विरोधात संतापाची लाट उसळली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा वाढता हस्तक्षेप यासर्व घडामोडींमुळे चायना मध्ये उत्पादन करणाऱ्या अनेक अमेरीकन कंपन्या स्थलांतरीत होत आहेत. भारतात उपलब्ध असलेली प्रचंड युवा शक्ती, साजेसे तापमान व भौगोलिक परिस्थितीमुळे अशा कंपन्या भारतालाच पहिली पसंती देतील अशी आशा होती. परंतु चायनातून भारतात स्थलांतरीत होणाऱ्या अमेरिकन कंपन्यांना राष्ट्राध्यक्ष ट्रंम्प यांनी एकप्रकारे धमकीच दिली आहे. अमेरिकन कंपन्यांनी चायनातून स्थलांतर अमेरिकेतच करावा अन्यथा अशा कंपन्यांना नव्याने जादा टॅक्स आकारला जाईल. तसेचअमेरिके सोबत असलेल्या ट्रेड अग्रीमेंटमुळे अमेरिकन कंपन्यांना जगातील इतर उत्पादकांशी स्पर्धा करावी लागत असल्याने अशा कंपन्यांना खास सुविधा देण्यात आली होती, मात्र चायना मधून अमेरिके व्यतिरिक्त इतर ठिकाणी स्थलांतर करणाऱ्या उत्पादकांना देण्यात आलेल्या सुविधा काढून घेण्यात येतील असा इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रंम्प यांनी दिला आहे. आयफोन मोबाईलचे उत्पादक ॲपल कंपनीने १०० % उत्पादन अमेरिकेतच करावे असे ट्रंम्प यांनी ठासून सांगितलेआहे.

चायनामधून काढता पाय घेण्याच्या तयारी असणाऱ्या कंपन्यांना भारतामध्ये उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासंदर्भात भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचा विचार सुरु झाला आहे. याचअंतर्गत भारतामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांना सहज जमीन उपलब्ध करुन देण्यासंदर्भात काम सुरु झाले आहे. चायनामधून भारतात येऊन इच्छिणाऱ्या कंपन्यांना कारखाने उभारण्यासाठी मोठा भूभाग उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु झाली आहे. या कंपन्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणारी जमीन ही युरोपमधील लग्झमबर्ग देशाच्या क्षेत्रफळाहून दुप्पट आकाराची असण्याची शक्यता आहे. भारतानने आतापर्यंत ४ लाख ६१ हजार ५८९ हेक्टर जमीन या कंपन्यांना देण्यासाठी निश्चित केली असल्याचे बोलले जात आहे. मात्र ट्रंम्प यांच्या भूमिकेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेक ईन इंडिया” च्या मनसुब्यांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. तसेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रंम्पसोबत असलेल्या त्यांच्यामधुर संबंधांबद्दल देखील प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

WhatsAppShare