चापेकर चौकात बसची वाट पाहत थांबला; आणि घडले असं काही

161

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – चिंचवड मधील चापेकर चौकात बसची वाट पाहत थांबलेल्या एका तरुणाचा मोबाईल फोन एका अनोळखी चोरट्याने चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 26) सकाळी सहा वाजता घडली.

अक्षय संजय चौधरी (वय 22, रा. चिंचवडगाव) यांनी याबाबतचा चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी अक्षय चौधरी चिंचवड गावातील चापेकर चौकात बस स्टॉपवर बसची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी त्यांनी शेजारी बॅगवर त्यांचा मोबाईल फोन ठेवला होता. एका अनोळखी चोरट्याने दुचाकीवरून येऊन फिर्यादी यांचा 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. त्यानंतर तो चोरटा दुचाकीवरून चिंचवड स्टेशनच्या दिशेने पळून गेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare