चाकरमान्यांनो, गावी न येता आपल्या मुंबई च्या घरी रहा – नितेश राणे

94
मुंबई दि. २१ (पीसीबी) –  मुंबईत हा विषाणू झपाट्याने पसरत असून त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. राज्य सरकारने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे व नववी व अकरावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने शाळा बंद आहेत. 
याच पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने चाकरमानी आपापल्या गावांकडे जायला निघाले आहेत. मात्र, त्यामुळे गावाकडच्या लोकांना चिंतेने ग्रासले आहे. तीच चिंता नीतेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे.