चाकण हिंसाचार प्रकरणी ५ हजार जणांवर सामूहिक गुन्हे दाखल

43

चाकण, दि. ३१ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चाकण येथे सोमवारी (दि.३०) झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्या तब्बल ५ हजार जणांवर सामूहिक गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी हिंसाचारात सहभागी लोकांवर दंगल घडवणे, जमाव जमवणे, पोलिसांवर हल्ला करणे अशा प्रकारच्या गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.