चाकण हिंसाचार प्रकरणी अटकसत्र सुरु; २० जण पोलिसांच्या ताब्यात; १०० हून अधिक आंदोलकांची ओळख पटली

76

गुरुवार, दि. २ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चाकण येथे सोमवारी (दि.३० जुलै) झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्यांविरोधात पोलिसांनी अटकसत्र सुरू केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी बुधवारी (दि.१) रात्री २० जणांना ताब्यात घेतले आहे. तर १०० हून अधिक आंदोलकांची ओळख सीसीटीव्ही फुटेजवरून पटली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.