चाकण हिंसाचारात परप्रांतीयांचा सहभाग; पोलिसांना संशय

785

चाकण, दि. ३१ (पीसीबी) – चाकण येथे झालेल्या मराठा आंदोलनात घुसखोरी करीत परप्रांतीयांकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याचा संशय चाकण पोलिसांनी व्यक्त केला आहे. आंदोलनात खुसखोरी करून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण दिल्याप्रकरणी ५ हजार जणांवर सामुहिक गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाकण पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांत शेजारील गावातल्या अनेक तरुणांना संशयीत म्हणून ताब्यात घेतले होते, असे तरुण या आंदोलनात सहभागी झाले असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर चाकण परिसरात एमआयडीसी असल्याने अनेक परप्रांतीय येथे कामानिमित्त राहतात, अशा लोकांवरही पोलिसांचा संशय आहे. कारण यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये अशा परप्रातीयांचा सहभाग उघड झाला आहे. या लोकांनीच अनेक पोलिसांना लक्ष करीत त्यांना काठ्यांनी बेदम मारहाण केली, तर त्यांच्या वाहनांची तोडफोड करत जाळपोळ केली. एका पोलिस कर्मचाऱ्याला सात जणांच्या समुहाने बेदम मारहाण केल्याची माहिती सुत्रांकडून कळते.

त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या या बाहेरील समाजकंटकांचा शोध सीसीटीव्ही, व्हॉट्सअॅपवर व्हारल होणारे विडिओ तसेच गावातील नागरिकांच्या मदतीने अटक करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.