चाकण, वाकड, देहूरोड मधून तीन दुचाकी चोरीला

64

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) -चाकण, वाकड आणि देहूरोड परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी मंगळवारी (दि. 18) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

स्वप्नील निवृत्ती कोंडे (वय 24, रा. महाळुंगे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 50 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 15 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सव्वासात वाजताच्या कालावधीत महाळुंगे येथील बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनी येथे घडली.

संदीप पोपटराव कानडे (वय 35, रा. रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना 14 जानेवारी रोजी रात्री सव्वाआठ वाजता उत्कर्ष चौक, वाकड येथील खानदेशी हॉटेलसमोर घडली.

संभाजी वाल्मिकी सुरेवाड (वय 39, रा. तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. फिर्यादी 15 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निगडी येथील लकी हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. ते साडेसात वाजता जेवण करून बाहेर आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.