चाकण येथे साडेसहा लाखांच्या गांजासह एकाला अटक

149

चाकण, दि. १७ (पीसीबी) – दोन पोत्यांमध्ये एकूण ४२ किलो ९९६ ग्रॅम वजनी ६ लाख ४५ हजार रुपये किमतीचा गांजा विकण्यासाठी आलेल्या एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई चाकण पोलिसांनी म्हाळुंगे चौकीच्या हद्दीतील तळेगाव-चाकण रस्त्या लगत असलेल्या महाराष्ट्र वजन काट्यासमोर केली.

सुरेश मारुती पवार (वय ५२, रा. धानोरा ता. जामखेड, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर काशिनाथ दळवी यांनी चाकण पोलिसा ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास चाकण पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, एक इसम म्हाळुंगे चौकीच्या हद्दीतील तळेगाव-चाकण रस्त्या लगत असलेल्या महाराष्ट्र वजन काट्यासमोर उभा असून त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या दोन पोत्यात गांजा आहे. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी सुरेश याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील पोत्यांची झडती घेतली असता त्यामध्ये ४२ किलो ९९६ ग्रॅम वजनी ६ लाख ४५ हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन सुरेश याला अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर अधिक तपास करत आहेत.