चाकण येथे नोकराने चेक चोरी करुन मालकाला घातला पावणेचार लाखांचा गंडा

103

चाकण, दि. १२ (पीसीबी) – एका बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफीसमध्ये कामाला असलेल्या नोकराने ऑफीसमधून चेक चोरी करुन आरटीजीएसव्दारे ३ लाख ८० हजारांची रक्कम काढून घेत मालकाला गंडा घातला. ही घटना मंगळवार (दि.२ एप्रिल) ते शनिवार (दि.१ जून) या कालावधीत चाकण माणिक चौकातील ज्ञानदा बिल्डर्स या कार्यालयात घडली.

याप्रकरणी श्री भगवान नारायण पोखरकर (वय ४२, रा. जय गणेश साम्राज्य, भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विकास चंद्रकांत मलघे (रा. स्वप्ननगरी, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्री भगवान यांचा बांधकाम व्यावसाय आहे. त्यांनी त्यांच्या चाकण येथील ज्ञानदा बिल्डर्स या कार्यालयात विकास याला कामाला ठेवले होते. मात्र मंगळवार (दि.२ एप्रिल) ते शनिवार (दि.१ जून) या कालावधीत विकास याने ऑफीसमधला चेक चोरी करुन आरटीजीएसव्दारे ३ लाख ८० हजारांची रक्कम काढून घेत मालकाची फसवणुक केली. आरोपी विकास याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.