चाकण येथील भामा नदीत आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

145

चाकण, दि. २१ (पीसीबी) – चाकण पोलीस ठाणे हद्दीतील वाकी गावतून वाहणाऱ्या भामा नदीच्या पात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी (दि. २०) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृताचे अंदाजे वय ३० ते ३५ असल्याचे समजते. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.