चाकण येथील कंपनीत ३ लाखांची चोरी

90

चाकण, दि. १० (पीसीबी) – कंपनीच्या दुरुस्तीसाठी आणलेले ३ लाख रुपये किमतीचे ताब्यांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरु नेले. ही घटना शुक्रवार (दि.८) रात्री साडेअकरा ते शनिवार (दि.९) सकाळी नऊच्या सुमारास चाकण वासुली येथील आर के मॅकटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली.  

याप्रकरणी रविंद्र भिकाजी चोरघे (वय ३२, रा. कर्वेनगर, वारजे माळवाडी गोसावीवस्ती, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविंद्र चोरघे यांची चाकण वासुली येथे आर के मॅकटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. शुक्रवार (दि.८) रात्री साडेअकरा ते शनिवार (दि.९) सकाळी नऊ या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कंपनीत प्रवेश करुन कंपनीच्या दुरुस्तीसाठी आणलेले ३ लाख रुपये किमतीचे ताब्यांचे साहित्य चोरुन नेले. चाकण पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.