चाकण तळेगाव चौकात कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत वृध्द किन्नर गंभीर जखमी

181

चाकण, दि. २१ (पीसीबी) – भरधाव कंटेनरने समोरुन दिलेल्या जोरदार धडकेत टेम्पोतील एक वृध्द किन्नर गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.२०) रात्री उशीरा दोनच्या सुमारास तळेगाव चाकण चौकात घडली.

रामहरी महादेव पडवळ (वय ६२, रा. म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि.पुणे) असे पाय फॅक्चर होऊन गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचे किन्नरचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालक एकनाथ नारायण भोर (वय ३४, रा.पुणे) याने कंटेनरचालकाविरोधात चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर चालक विकास सहदेव यादव (रा. वसई) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टेम्पो चालक एकनाथ भोर हे त्यांच्या ताब्यातील टेम्पो (एमएच-१४-बीजे-१६७२) घेऊन चाकण तळेगाव चौक येथून सोमवारी रात्री उशीरा दोनच्या सुमारास चालले होती.त्यांच्यासोबत टेम्पोच्या किन्नर बाजूस वृध्द किन्नर रामहरी पडवळ बसले होते. यावेळी समोरु आलेल्या कंटेनर (एमएच-४८-८०६२) चालक विकास यादव याने टेम्पोला समोरुन जोरदार धडक दिली. यामध्ये रामहरी पडवळ यांचा पाय फॅक्चर होऊन ते गंभीर झाले आणि टेम्पोचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चाकण पोलिस तपास करत आहेत.