चाकण जवळील काळूस येथे विष प्राशन करून ५० वर्षीय इसमाची आत्महत्या

274

चाकण, दि. २३ (पीसीबी) – विष प्राशन करून एका ५० वर्षीय इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. ही घटना चाकण येथील काळूस येथील जाचकवस्ती परिसरातील एका शेतात घडली. मात्र, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

मारूती बाबुराव धाडगे (वय ५०, मुळ रा. दावडी, ता. खेड, पुणे) असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी संदीप किसन पवळे (वय ४१, रा. पवळेवाडी, काळूस, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारूती यांनी सोमवारी काळूस येथील जाचकवस्ती परिसरातील एका शेतात जावून विषारी औषधी प्राशन केली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र मारूती यांनी हे टोकाचे पाऊल कशामुळे उचलेले याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे पवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाकण पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. चाकण पोलिस तपास करत आहेत.