चाकणमध्ये ४२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

168

चाकण, दि. २२ (पीसीबी) – घराचा दरवाजा खूला राहिल्याने अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करुन घरातील तीन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ४१ हजार ७४० रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२१) दुपारी तीन ते साडेसहाच्या दरम्यान चाकण येथील मेदनकरवाडीतील घरात घडली.

याप्रकरणी मंगला सुभाष बैरी (वय २७, रा. बालाजीनगर, चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी तीन ते साडेसहाच्या दरम्यान फिर्यादी बैरी यांच्या मेदनकरवाडी येथील घराचा दरवाजा उघडा होता. यावेळी अज्ञात चोरट्याने घरात घुसून घरात ठेवलेले तीन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ४१ हजार ७४० रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. चाकण पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.