चाकणमध्ये संतप्त आंदोलकांचा पोलिस ठाण्यावर हल्ला; १०० वाहनांचे नुकसान; पोलिस अधिकारी कर्मचारी जखमी

286

चाकण, दि. ३० (पीसीबी) – मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी चाकणमध्ये काढलेल्या मोर्चाला आज (सोमवार) हिंसक वळण लागले. आक्रमक मोर्चेकऱ्यांनी १०० हून अधिक वाहनांची तोडफोड केली असून ८ ते १० वाहने जाळण्यात आली आहेत. तसेच पोलिसांच्या देखील १० वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

या घटनेमध्ये काही पोलिस अधिकारी, कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. परिस्थिती हाता बाहेर गेल्याने सध्या पोलिसांनी येथे जमाव बंदीचा कायदा लागू केला आहे. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील चाकण मध्ये दाखल झाले असून त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. पोलिसांनी चाकणमधील काही भागात इंटरनेट आणि मोबाइल सेवा बंद केली आहे. पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या बस रद्द करण्यात आल्या आहेत.