चाकणमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संतप्त आंदोलकांकडून एसटी आणि पीएमपी बसची तोडफोड

38

चाकण, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज (सोमवार) आळंदी, खेड आणि चाकण येथे बंदचे आवाहन करण्यात आले असून येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बंदमुळे शहरपरिसरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. दरम्यान, चाकण येथे काही आंदोलकांनी हिंसक होत ३ एसटी आणि १ पीएमपी बसवर दगडफेक करीत त्यांच्या काचा फोडल्या आहेत.