चाकणमध्ये मराठा आंदोलन चिघळले; जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार, लाठी चार्ज

453

चाकण, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज (सोमवार) आळंदी, खेड आणि चाकण येथे बंदचे आवाहन करण्यात आले होते. यामुळे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला होता. मात्र काही संतप्त आंदोलकांनी २५ ते ३० वाहनांची तोडफोड केली.

तसेच काही एसटी बस आणि पीएमपी बस जाळण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठी चार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या तर काही ठिकाणी हवेत गोळीबार केल्याचे समजते. यामुळे संपूर्ण चाकण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.  पोलिसांनी परिसरात सध्या जमाव बंदीचा कायदा लागू केला आहे.