चाकणमध्ये भरधाव शिवशाही बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

110

चाकण, दि. १४ (पीसीबी) – भरधाव ‘शिवशाही’बसच्या धडकेत एका ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.२ जून) रात्री पावणेनऊच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे घडली.

रघुनाथ लक्ष्मण वाघमारे (वय ६८, रा. डोणगाव, ता. बिलोली, जि. नांदेड) असे मृत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ महादेव होले (वय ४६, रा. सासवड) या बस चालकाविरोधात गुरुवारी (दि. १३) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमनाथ हे शनिवार २ जून रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील शिवशाही बस (क्र. एमएच/०९/ईएम/१७२०) चाकण येथील पुणे-नाशिक महामार्गावरून घेऊन जात होते. यावेळी त्यांनी रस्ता ओलांडणाऱ्या रघुनाथ यांना जोरदार धडक दिली. या घटनेत रघुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी सोमनाथ यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस तपास करत आहेत.