चाकणमध्ये पोलिसांचे ड्रोनद्वारे परिस्थितीवर लक्ष

104

चाकण, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (गुरूवार) महाराष्ट्र बंद पुकाराला आहे. चाकणमध्ये आज पुन्हा बंद पाळण्यात आला आहे. यावेळी रास्ता रोको न करता शांततेत बंद केला जाणार असल्याचे मराठा आंदोलकांनी सांगितले आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस सध्या वेशात तैनात करण्यात आले आहेत. तसेच ड्रोनद्वारे पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.  

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणमध्ये केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान करण्यात आले होते. जोळपोळ, दगडफेकीत अनेकजण जखमी झाले होते. संतप्त जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. त्यामुळे पोलिसांनी आज पाळलेल्या बंदमध्ये अनुचित प्रकार घडू नये, म्हणून खबरदारी घेतली आहे.