चाकणमध्ये पैशांच्या वादातून बापलेकाला लोखंडी रॉडने मारहाण

134

चाकण, दि. १४ (पीसीबी) – किरकोळ पैशांच्या वादातून तिघाजणांनी मिळून बापलेकाला लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना शुक्रवार (दि.१२) सायंकाळी सातच्या सुमारास मौजे शेलपिंपळगाव ता खेड येथे घडली.

याप्रकरणी जखमी नितीन रामदास कराळे (वय २३, शेलपिंपळगाव, ता.खेड) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पंडित पांडुरंग कदम, प्रमोद पंडित कदम (वय २१) आणि प्रविण पंडित कदम (वय १९, रा. शेलपिंपळगाव) या तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार सायंकाळी सातच्या सुमारास मौजे शेलपिंपळगाव येथे जखमी नितीन आणि तिघे आरोपी पंडित, प्रमोद आणि प्रविण यांमध्ये पैशांवरुन वाद झाला. यामुळे आरोपींनी नितीन आणि त्याचे वडिल रामदास यांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस तपास करत आहेत.