चाकणमध्ये पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण

145

चाकण, दि. १३ (पीसीबी) – पैशांच्या वादातून एका तरूणाने दुसऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. १२) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नाणेकरवाडी – कर्पेवस्ती येथे घडली.

दिलू कृष्णचंद्र दलाई (वय २२, रा. कर्पेवस्ती, नाणेकरवाडी, ता. खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ईश्वर भरत साहू (वय ३०, रा. कर्पेवस्ती, नाणेकरवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी जखमी दिलू आणि आरोपी ईश्वर या दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारातून भांडण झाले होते. यामध्ये ईश्वर याने दिलू याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले. यामध्ये दिलू गंभीर जखमी झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.