चाकणमध्ये पीएमपी बसच्या प्रवासा दरम्यान वृध्द महिलेचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी केले लंपास

172

चाकण, दि. ३० (पीसीबी) – पीएमपी बसने तळेगाव चौक ते कुरुळी बस स्टॉपच्या दरम्यान प्रवास करत असताना एका वध्द महिलेच्या पर्स मधील सोन्याचे गंठण दोन अनोळखी महिला आणि त्यांच्या सोबतच्या दोन लहान मुलांनी लंपास केले. ही घटना बुधवारी (दि.२९) सकाळी अकरा ते साडेअकरा दरम्यान घडली.

या प्रकरणी ६१ वर्षीय महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार दोन अज्ञात महिला आणि त्यांच्यासोबतच्या दोन लहान मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृध्द महिला घरकामगार आहे. बुधवारी त्या पीएमपी बसने तळेगाव चौक ते कुरुळी बस स्टॉप दरम्यान प्रवास करत होत्या. यावेळी बसमध्ये प्रवास करणाऱ्या दोन अनोळखी महिला आणि त्यांच्या सोबतच्या दोन लहान मुलांनी वृध्द महिलेच्या जवळील पर्स मध्ये असलेले सोन्याचे गंठण चोरुन नेले. चाकण पोलिस तपास करत आहेत.