चाकणमध्ये नवी दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

1603

चाकण, दि. २७ (पीसीबी) – विरुध्द दिशेने येत असताना नवी दुचाकी स्लिप होऊन झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२६) दुपारी तीनच्या सुमारास चाकण येथील पुणे नाशिक रस्त्यावरील हिरो शोरुम समोर घडली.

निलेश संजय माने (वय २२, रा. स्वप्ननगरी, चाकण) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी योगेश भगवान पवार (वय २७, रा.राबिरदवाडी, खेड) याने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत निलेश हा रविवारी दुपारी तीनच्या सुमारास त्याच्या नवीन होंडा डिओ डी.एक्स या दुचाकीवरुन वेगाने चाकण येथील पुणे-नाशिक रस्त्यावर असलेल्या हिरो शोरुम समोरील रस्त्यावरुन विरुध्द दिशेने जात होता. यावेळी त्याचा अचानक दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी स्लिप होऊन थेट दुसऱ्या बाजूने येणाऱ्या एका पिवळ्या रंगाच्या बसला जाऊन धडकली. यामध्ये निलेश हा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. चाकण पोलिस तपास करत आहेत.