चाकणमध्ये धावत्या बसच्या आडवी स्कॉर्पिओ लावून बसचालकाला जबर मारहाण

175

चाकण, दि. १२ (पीसीबी) – धावत्या बसच्या आडवी स्कॉर्पिओ लावून एका बसचालकाला दोघांनी जबर मारहाण करुन धमकावले. ही घटना गुरुवार (दि.११) रात्री पावणेएकच्या सुमारास तळेगाव-चाकण चौकात घडली.

सुनिल बबन कारंडे (वय ४९, रा. रासे. खेड) असे जखमी बसचालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ऋषिकेश घोलप आणि ओमकार थिगळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार रात्री पावणेएकच्या सुमारास फिर्यादी सुनिल हे त्यांच्या ताब्यातील बस (क्र. एमएच/१४/बिए/९५३४) घेऊन तळेगाव-चाकण चौकातून जात होते. यावेळी मागून आलेल्या स्कॉर्पिओ कार (क्र. एमएच/१४/इसी/९८८६) मधील आरोपी ऋषिकेश आणि ओमकार या दोघांनी बसच्या आडवी स्कॉर्पिओ लावून बस थांबवली. तसेच बसचालक सुनिल यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत धमकावले. याप्रकरणी चाकण पोलिसांनी ऋषिकेश आणि ओमकार या दोघांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.