चाकणमध्ये तरुणीसमोर अश्लील चाळे करुन अंगावर लेझर किरणे चमकावल्याने तीघांवर गुन्हा

1150

चाकण, दि. २३ (पीसीबी) – तरुणीचा पाठलाग करुन अश्लील चाळे करत तिच्या अंगावरुन लेझर किरणे चमकावल्याने तीन तरुणांवर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी घरात असताना तिच्या फ्लॅट समोरील बल्डिंगच्या गच्चीवरुन अश्लील हावभाव करुन आरोपी तिच्या अंगावर लेझर किरणे फिरवायचे. हा प्रकार बुधवारी (दि.२३) रात्री पावनेदहाच्या सुमारास चाकण गाव येथील स्वप्नगरी सोसायटी, डी.बिल्डींगमधील चोथ्या मजल्यावरील रुम नं. २१ येथे झाला.

याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने चाकण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार नरेंद्र संभाजी वाळुंज (वय २३, रा. स्वप्ननगरी, एन बिल्डींग, रुम नं.१६), विठ्ठल भाऊसाहेब बुंरुगळे (वय २३, रा. बिल्डींग नं.१, रुम.नं.५०६, पाचवा मजला चाकण) आणि ऋषिकेश डफळ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात कलम ३५४ अंतर्गत महिला छेडछाडचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २२ वर्षीय तरुणी आपल्या चार मैत्रीणींसोबत चाकण येथील स्वप्नगरी सोसायटीमध्ये राहते. महिन्या भरापासून आरोपी तीचा पाठलाग करुन त्यांच्या घरा समोरील बिल्डींगच्या गच्छी वरुन तरुणीच्या आणि तिच्या मैत्रीणींच्या अंगावरुन लेझर किरणे चमकवायचे, तसेच तरुणीना पाहून अश्लील चाळे करत होते. बुधवारी रात्री पावनेदहाच्या सुमारास तिघा आरोपींनी असाच प्रकार केला. तरुणीच्या हे लक्षात आले. तिने तातडीने चाकण पोलिसात धाव घेऊन नरेंद्र, विठ्ठ आणि ऋषिकेश या तिघांविरोधात तक्रार दाखल केली. चाकण पोलिसांनी या तिघांविरोधात मुलींची छेडछाड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलिस तपास करत आहेत.