चाकणमध्ये तरुणी समोर अश्लील चाळे करुन अंगावर लेझर किरणे चमकावल्याने तीघांवर गुन्हा

123

चाकण, दि. २३ (पीसीबी) – तरुणीचा पाठलाग करुन अश्लील चाळे करत तिच्या अंगावरुन लेझर किरणे चमकावल्याने तीन तरुणांवर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी घरात असताना तिच्या फ्लॅट समोरील बल्डिंगच्या गच्चीवरुन अश्लील हावभाव करुन आरोपी तिच्या अंगावर लेझर किरणे फिरवायचे. हा प्रकार बुधवारी (दि.२३) रात्री पावनेदहाच्या सुमारास चाकण गाव येथील स्वप्नगरी सोसायटी, डी.बिल्डींगमधील चोथ्या मजल्यावरील रुम नं. २१ येथे झाला.