चाकणमध्ये तरुणीचा पाठलाग करुन विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

1109

चाकण, दि. १० (पीसीबी) – आई-वडिलांसोबत गावी निघालेल्या तरुणीचा पाठलाग करुन, तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे बोलून, अश्लिल हातवारे करुन त्रास देणाऱ्या तरुणाला तरुणीच्या आई-वडिलांनी चांगलाच चोप देऊन चाकण पोलिसात दिले. ही घटना बुधवार (दि.५) सायंकाळी सातच्या सुमारास चाकण चौक एच.पी पेट्रोल पंपाजवळ घडली.

याप्रकरणी पिडीत तरुणीने चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार अर्जुन जैतासिंग राठोड (रा. मेदनकरवाडी, चाकण मुळ.रा. बार्षी टाकळी, अकोला) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्जुन हा बऱ्याच दिवसांपासून पिडीत तरुणीचा पाठलाग करुन तिला अश्लिल भाषेत बोलून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत होता. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास पिडीत तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत टमटमने जवगाव या तिच्या मुळगावी निघाली होती. यावेळी आरोपी तरुणाने (दुचाकी क्र. एमएच/१४/ईटी/०४५३)   ने तिचा पाठलाग करुन टमटम चाकण चौक एच.पी पेट्रोल पंपाजवळ थांबला असता, अश्लिल भाषा वापरुन, तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे बोलून तिचा विनयभंग केला. यावर पिडीत तरुणीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. आई-वडिलांनी अर्जुन याला चोप देऊन चाकण पोलिसात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.