चाकणमध्ये किरकोळ कारणावरुन दोघा मित्रांना मारहाण

519

चाकण, दि. ७ (पीसीबी) – कॉफीचा कप कॅन्टीनमध्ये ठेवण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून तिघाजणांनी मिळून दोघा मित्रांना जबर मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि.६) सायंकाळी सातच्या सुमारास चाकण येथील मिंडा कॉप. लि या कंपनीत घडली.

दत्तात्रय कारंडे (वय २९) आणि त्याचा मित्र जितेंद्र महाजन (दोघेही रा. चाकण) असे मारहाण झालेल्या दोघा मित्रांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांनी चाकण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अक्षय आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास जखमी दत्तात्रय आणि आरोपी अक्षय यांच्यामध्ये  कॉफीचा कप कॅन्टीनमध्ये ठेवण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. यावर अक्षय आणि त्यांच्या दोन साथीदारांनी मिळून दत्तात्रय कारंडे यांना हेल्मेटने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी दत्तात्रयचा मित्र जितेंद्र याने मद्यस्ती केली असता आरोपींनी त्याला देखील मारहाण केली. पोलिसांनी अक्षय आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलिस अधिक तपास करत आहेत.