चाकणमध्ये कामाबद्दल ओरडून बोलल्याने सुपरवायझरला जबर मारहाण करुन जीवेमारण्याची धमकी

2368

चाकण, दि. ४ (पीसीबी) – कंपनीमध्ये कामाच्या कारणावरुन ओरडून बोलल्याने तिघा जणांनी मिळून कंपनीच्या सुपरवायझरला बांबु आणि पटट्याने जबर मारहाण करुन जखमी केले. ही घटना सोमवार (दि.३) सायंकाळी सहाच्या सुमारास चाकणमध्ये घडली.

अक्षय अनिल लोमटे (वय १८, रा. जंबुकरवाडी, बाळु पवार यांच्या खोलीत, चाकण) असे मारहाण झालेल्या कंपनीतील सुपरवायझरचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार ज्ञानोबा शिंदे, सुर्यकांत शिंगाडे आणि चेतन झोलेकर (सर्व रा. जंबुकरवस्ती, चाकण) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय हा चाकणमधील एका कंपनीत सुपरवायझर आहे. त्या ठिकाणी आरोपी ज्ञानोबा, सुर्यकांत आणि चेतन हे तिघेही काम करतात. सोमवारी काम करत असताना अक्षय कामाच्या कारणावरुन ज्ञानोबाला ओरडून बोलला. या गोष्टीचा राग आल्याने ज्ञानोबा, सुर्यकांत आणि चेतन या तिघांनी मिळूण अक्षय याला बांबु आणि पटट्याने जबर मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. पोलीसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.