चाकणमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जमावबंदीचे कलम लागू

34

चाकण, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने चाकण परिसरात आज (सोमवार) आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आंदोलकांनी अनेक एसटी गाड्यांसह पीएमपीच्या बसेसची जाळपोळ करीत पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. तरीही हिंसाचार थांबत नसल्याने अखेर पोलिसांनी येथे जमावबंदीचे १४४ कलम लागू केले आहे.