चाकणमध्ये अल्पवयीन तरुणीला अश्लील हावभाव करुन चिडवणाऱ्या दोघांवर गुन्हा

488

चाकण, दि. ११ (पीसीबी) – अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करुन अश्लील हावभाव करत चिडवल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एक महिन्यापासून रोज तरुणीसोबत घडत होता.

याप्रकरणी पीडित १७ वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार प्रशांत बिरदवडे आणि संतोष साकोरे या दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय तरुणी हि चाकण परिसरात राहते. आरोपी प्रशांत आणि संतोष हे दोघे देखील त्याच परिसरात राहतात. मागील एक महिन्यापासून दोघे आरोपी पीडित तरुणीचा वारंवार पाठलाग करुन अश्लील हावभाव करुन इशारे करत होते. तसेच रस्त्यावर आणि शाळेत जाऊन तरुणीला अश्लील भाषेत चिडवत होते. यावर तरुणीने चाकण पोलीसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानुसार प्रशांत आणि संतोष या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.