चाकणमध्ये अज्ञात वाहनाने चिरडल्याने पादचारी तरुणाचा मृत्यू

116

चाकण, दि. १८ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालेल्या एका तरुणाला भरधाव अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना राणुबाईमळा चाकण ते तळेगाव बाजुकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

अशोक भरत महानवर (वय २०, रा. डीजीटल सर्कीट, कंपनी, खालुंब्रे) असे मयत पादचारी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अशोक हा खालुंब्रे येथील एका कंपनीत कामाला होता. गुरुवार (दि.१३) रात्री साडेआठच्या सुमारास तो राणुबाईमळा चाकण ते तळेगाव बाजुकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन पायी चालला होता. यावेळी भरधाव अज्ञात वाहनाने त्याला चिरडले. वाहनाचे चाक त्यांच्या पायांवर आणि कंबरेवरुन गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. चाकण पोलीस आरोपी वाहन चालकाचा शोध घेत आहेत.