चाकणमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

137

चाकण, दि. ११ (पीसीबी) – अज्ञात वाहनचालकाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना चाकण येथील रोहकल ते भाम रस्त्यावर घडली.

विठ्ठल नथु बच्चे (वय ३७, रा. देवोशी ता. खेड) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी बाळु नथु बच्चे (वय ४२, रा. देवोशी, खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.६) दुपारी साडेचारच्या सुमारास मयत विठ्ठल हे त्यांच्या दुचाकी (क्र.एमएच/१४/एटी/८१५६) वरुन आंबेठाण एमआयडीसी येथे कामाला निघाले होते. ते भाम येथे पोहचेल असता अज्ञात वाहनचालकाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होवून विठ्ठल यांचा मृत्यू झाला. चाकण पोलिस आरोपी वाहनचालकाचा शोध घेत आहेत.