चाकणमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

90

चाकण, दि. १८ (पीसीबी) – विरुद्ध दिशेने आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ९) महाळुंगे चाकण येथे घडली.

प्रथमेश संजय शिंदे (वय २२, रा. त्रिवेणीनगर, निगडी. मूळ रा. कुंभारखाणी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी रविवारी (दि. १७) चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश हा शनिवारी त्यांच्या दुचाकीवरून महाळुंगे चाकण येथून जात होते. तो इंडोरन्स कंपनीकडून एच पी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने प्रथमेश याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये प्रथमेश याचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनचालक घटनेची माहिती न देताच वाहनासह पसार झाला. चाकण पोलीस तपास करत आहेत.