चाकणमधील त्या बेपत्ता चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

112

चाकण, दि. २४ (पीसीबी) – नाणेकरवाडी येथून शनिवारी सायंकाळी सहापासून चिकू मिथुन राठोड (वय २ वर्षे, रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड) हा बेपत्ता झाला होता.या चिमुकल्याचा मृतदेह रविवारी (दि.२३) सकाळी घराजवळील जिन्याच्या खाली असलेल्या पाण्याच्या टाकीत आढळून आला.

सुरुवातीला चिकूचे अपहरण झाल्या संशय पोलिसांना होता. मात्र चाकण पोलिसांनी घराच्या परिसरात शोध घेतला असता चिकू हा घराजवळील जिन्याच्या खाली असलेल्या पाण्याच्या टाकीत मृत अवस्थेत आढळून आला. चिकूचा मृतदेह शवविच्छेदन करुन घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. चिकुचा घातपात झाला कि तो स्वत: पाण्याच्या टाकीत जावून पडला हे अद्याप समजू शकले नाही. चाकण पोलिस तपास करत आहेत.