चाकणमधील ग्लोबल अफेक्सेसरीज कंपनीतून चोरट्यांनी लांबवले पावणेचार लाखांचे बारोनी

148

चाकण, दि. २७ (पीसीबी) – चाकण येथील ग्लोबल अफेक्सेसरीज कंपनीतून बारोनी नावाचे तब्बल ३ लाख ५९ हजारांचे रिसायकल होणारे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. ही चोरी शनिवारी (दि.२५) सायंकाळी पाच ते रविवारी (दि.२६) सकाळी साडेआठच्या दरम्यान चाकण येथील नाणेकरवाडी हद्दीत असलेल्या ग्लोबल अफेक्सेसरीज प्रायवेट लिमिटेड या कंपनीतून करण्यात आली.

याप्रकरणी कंपनीतील क्लार्क दिलीप दामोदर जाधव (वय ५०, रा. आगरकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२५) सायंकाळी पाच ते रविवारी (दि.२६) सकाळी साडेआठच्या दरम्यान चाकण येथील नाणेकरवाडी हद्दीत असलेल्या ग्लोबल अफेक्सेसरीज प्रायवेट लिमिटेड या कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी बारोनी नावाचे तब्बल ३ लाख ५९ हजारांचे रिसायकल होणारे साहित्य चोरुन नेले आहे. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलिस तपास करत आहेत.