चाकणच्या खराबवाडीत अवघ्या १९ वर्षांच्या दोन तरूणांवर प्राणघातक हल्ला; एकाचा जागीच मृत्यू

711

चाकण, दि. ९ (पीसीबी) – चाकणच्या खराबवाडीमध्ये महाविद्यालयातील कार्यक्रमाच्या वादातून टोळक्याने दोन तरूणांवर कोयता, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. शुक्रवारी (दि. ८) रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. प्रशांत धर्मनाथ बिरदवडे (वय १९, रा. राणूबाईमळा, चाकण) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या हल्ल्यात पियुष शंकर धाडगे (वय १९, रा. राणूबाईमळा, चाकण) हा गंभीर जखमी झाला आहे.